अमरावती येथे कुणबी समाजाचे परिचय संमेलन संपन्न..

 



25 फेब्रुवारी 2024 रोजी अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे कुणबी समाजाचे परिचय संमेलन संपन्न..



कुणबी मराठा पाटील समाजाच्या 650 युवक युवतींचा परिचय संमेलनात सहभाग..


▪️वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी वधू-वरांची मने जुळणे गरजेचे - अविनाश कोठाळे, अध्यक्ष,जिजाऊ बँक.

           

▪️ कुणबी मराठा पाटील समाजाने अनिष्ट रूढी व प्रथा यापासून अलिप्त व्हावे - दिलीप  जगताप,राष्ट्रीय अध्यक्ष,अ. भा. मराठा महासंघ.



▪️ कुणबी समाजाच्या युवक युवतींनी संस्कारक्षम व्हावे - माजी मंत्री गुलाबराव गावंडे    



    शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठान व समाज भूषण  निलेश उभाड यांनी केले, राज्यस्तरीय कुणबी समाजाचे वधू-वर परिचय संमेलन यशस्वी...

                                    


     कुणबी मराठा पाटील समाजाच्या वधू-वर परिचय संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री श्री गुलाबराव गावंडे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  दिलीप जगताप, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, समाजभूषण  प्रकाश साबळे, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, समाज भूषण  विनोद कोरडे, डॉ. बाळकृष्ण आमले, प्रवीण तायडे,  राम मुळे,तुषार मानकर, विशंभर मार्के, देवेन भाकरे, अरविंद कडू, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post