मिरज : शनिवार दि.24/02/2024 रोजी मालगांव ता.मिरज येथील मातंग समाज मंदिर या ठिकाणी मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीदरम्यान
"मातंग समाजाची मुळ समस्या" या विषयावर चर्चा करत असताना..
1) सामाजिक जागृती म्हणजे काय ?
2) जागृतीचे सिद्धांत म्हणजे नेमकं काय?
3) प्रबोधन करणे म्हणजे काय ?
4) भगवान गौतम बुद्धांनी कशावर आधारित आंदोलने केली, त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उद्देश काय होता ?
आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले.
सदर बैठक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत मोहिते , राज्य सचिव महादेव दोडमणी यांच्या उपस्थितीमध्ये सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष अल्विन भंडारे यांचे नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन केले होते.
तसेच सदर बैठकीस मातंग सेवा संघाचे कार्यकर्ते व समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.