मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
कवयित्री सौ पूर्णिमा आनंद शेंडे लिखित, 'न्यूज स्टोरी टुडे' प्रकाशित पौर्णिमानंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक, कवी सतिश सोळाकुंरकर, माजी के ई एम अधिष्ठाता मा. डाॅ अविनाश सुपे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्वाती सुपे, तसेच 'न्यूज स्टोरी टुडे'चे प्रकाशक,संपादक मा.देवेंद्र भूजबळ व त्यांच्या सुविद्य पत्नी 'न्युज स्टोरी टूडे'संपादिका व निर्मात्या सौ अलका भूजबळ आणि प्रसिद्ध कवयित्री व गीतकार सौ सुरेखा गावंडे या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. रविवार दिनांक 18 फेब्रुवारी सिनेमन हाॅल,
एमराल्ड क्लब, स्वस्तिक पार्क चेबूंर मुबंई येथे संध्याकाळी चार वाजता रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया दिमाखात पार पडला.
पौर्णिमा शेंडे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला सौ चैताली साटम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. 'न्यूज स्टोरी टुडे'चे देवेंद्र भूजबळ यांनी आपले मनोगत मांडले व सौ अलका भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. स्वाती सुपे यांनी कवयित्री पौर्णिमा शेंडे यांचे मन:पूर्वक कौतुक केले. जेष्ठ कवयित्री सुरेखा गावंडे यांनी सांगितले.
पौर्णिमानंद या काव्यसंग्रहातील कविता या स्त्री मनाचे कंगोरे उलगडणाऱ्या, स्त्री मनाच्या जाणीव करून देणाऱ्या स्त्री प्रधान कविता आहेत. अध्यक्षीय भाषणात सुप्रसिद्ध कवि सतीश सोलांकुरकर यांनी म्हटले की.. कवयित्री पौर्णिमा शेंडे यांच्या कविता हलक्या-फुलक्या शब्दामध्ये, मुक्त छंदातल्या, सहज.. सुलभ.. आनंद देणाऱ्या अशा या कविता आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका भुजबळ यांनी केले आणि गंधाली मोटे यांनी आभार मानले.संपूर्ण कार्यक्रम प्रेक्षक श्रोत्यांनी दाद देत उचलून धरला.