लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न
अकोला -- समाज मनाचे प्रतिबिंब शासन प्रशासनासमोर ठेऊन,चुकलेल्यांना जाणीव देत सामाजिक समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजमनाचा आरसा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत.साहित्यिकांच्या प्रबोधन आणि जागृती कार्याला मर्यादा असतात,परंतू पत्रकारांकडून प्रबोधन,जागृती आणि वृत्तपत्रातून चालविल्या जाणाऱ्या चळवळी ह्या शक्तीशाली ठरलेल्या आहेत.वृत्तपत्रातून प्रसारीत होणाऱ्या साहित्यातील शब्दांमध्ये माणसांना माणसांसोबत जोडण्याचे सामर्थ्य आहे.असे वास्तवतादर्शी प्रतिपादन अंकुर साहित्य संघाचे केन्द्रीय कार्य.सदस्य प्रा.मोहन काळे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या तृतिय विचारमंथन तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,(निंबेकर) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ सेवाव्रती प्रा.राजाभाऊ देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून आणि केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्वप्रथम नियमित शिरस्त्याप्रमाणे सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना हारार्पण करून वंदन करण्यात आले. अमरावतीजवळ समृध्दी महामार्गावर ट्रॅव्हल बस कंटेनरला धडकून मृत्यूमुखी पडलेल्या तिघांना आणि मराठा आरक्षण प्रश्नाततील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
प्रा.मोहन काळे यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्य प्रवासाबद्दल सन्मानपत्र,शाल, पुष्पगुच्छ देऊन तर सुत्रसंचालक मनोज देशमुख यांना जन्मदिन अभिष्टचिंतन म्हणून सन्मानित करण्यात आले.प्रा.राजाभाऊ देशमुख व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सागर लोडम यांचा दिनदर्शिका सेटिंगबध्दल, तर अकोल्यात अधिकारी,शासकीय कार्यालये व महत्वाच्या ठिकाणी दिनदर्शिका पोहचविणाऱ्या जिल्हा कार्य.सदस्य पत्रकार दिलीप नवले यांचाही सन्मान करण्यात आला.
संजय देशमुख यांनी मंत्रालयीन सचिव स्तरावर,मॉरिशसच्या मराठी मंडळाकडे आणि अधिकारी,लोकप्रतिनिधींकडे पोहचलेल्या दिनदर्शिकांबध्दल माहिती दिली.तसेच लातूरमध्ये महाराष्ट्र संघटन संपर्क प्रमुख भगीरथ बद्दर व सक्रिय सभासद जाविद सिध्दीकी यांनी कबीर प्रतिष्ठाण आणि हिन्दी साहित्य अॕकॕडेमीच्या व्यासपीठावर दिनदर्शिकेच्या केलेल्या प्रकाशनाचीही माहिती दिली.
या कार्यक्रमाला केन्द्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,उपाध्यक्ष किशोर मानकर,मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराजजी गावंडे,अंबादास तल्हार, सौ.जया भारती,के.व्ही.देशमुख, अॕड.विजयराव देशमुख डॉ.विनय दांदळे, डॉ.शंकरराव सांगळे,नानासाहेब देशमुख, प्रा.विजय काटे, सुरेश पाचकवडे,देवीदास घोरळ,सतिशराव देशमुख,वेणीकोठीकर,अॕड.कृष्णा देशमुख,
पंजाबराव वर, सतिश देशमुख,संतोष धरमकर,अनंतराव देशमुख,वसंतराव देशमुख,नारखेडकर,कृष्णा चव्हाण,गजानन चव्हाण,अॕड.संकेत देशमुख,जिल्हा सहसचिव मनोहर मोहोड,सौ.दिपाली बाहेकर, डॉ.अशोक सिरसाट,रविन्द्र देशमुख,दै.भास्करचे कैलास टकोरे,शिवचरण डोंगरे,सुरेश भारती,सतिश देशमुख उगवेकर,व ईतर पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रदिपजी खाडे,सुत्रसंचलन मनोज देशमुख तर आभारप्रदर्शन केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.