१९७५ च्या बहिरम कापूस आंदोलनाचा ५० वा स्मृतिदिन साजरा केला कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी





🔹 कापूस उत्पादक महिला शेतकऱ्यांच्या नेतृत्वात बहिरम परिसरात (दिंडी पदयात्रा)..


🔹 दि.२४ जानेवारी २०२४ रोजी १९७५ साली झालेल्या बहिरम कापूस आंदोलनातील शहीद शेतकरी स्व.विठ्ठलराव दोतोंडे व आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्व.दादासाहेब हावरे,स्व.भाऊ साबळे,स्व.शंकरराव बोबडे,स्व.मामराज खंडेलवाल,स्व.विनायकराव कोरडे,स्व.केशरबाई सीकची,स्व.वामनराव खलोकार यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहली सामूहिक श्रद्धांजली...

बहिरम कापूस आंदोलनाचा ५० वा स्मृतिदिन शेतकरी नेते व शेतकरी चळवळीतील अग्रणी गजाननराव अहमदाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

🔹 बहिरम कापूस लढ्याच्या स्मृतीतून नव्या शेतकरी आंदोलनाचा प्रारंभ- गजाननराव अहमदाबादकर

🔹 बहिरम कापूस आंदोलन शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे- प्रकाश साबळे

🔹 भांडवलदाराची कर्जमाफी कृषिप्रधान भारत देशाला व अर्थव्यवस्थेला मारक-प्रा.डॉ.दिलीप काळे


प्रमुख मान्यवरांमध्ये मा.जानराव पाटील,मा.सुधाकरराव हावरे,मा.रविभाऊ खंडेलवाल,विदर्भकुमार बोबडे,प्रकाश साबळे, मनीष हावरे,गोपाल भालेराव, वामनराव दोतोंडे आदी मान्यवर मंडळी प्रमुख उपस्थिती होती..


याप्रसंगी अक्षय जवंजाळ, अक्षय साबळे,विपुल चौधरी, राहुल सोलव,सतीश ठाकरे,निलेश दोतोंडे व परिसरातील मंडळींचे भरपूर सहकार्य लाभले..

याप्रसंगी अचलपूर, चांदुर बाजार,अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेकडो शेतकरी आवर्जून उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post