अखेर........ गंगाजळी येथील प्रवासी निवारा पूर्णत्वास...

 




मेहनत, संघर्ष, जिद्दीच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून गंगाजळी येथील नागरीकांसाठी प्रवासी निवारा तयार करून घेतला - सुरज वानखडे



 धामणगाव रेल्वे प्रतिनिधी 


अनेक वर्षापासून धामणगाव विरूळमार्गे अमरावती मेंन रोड मार्गावरील प्रवासी निवाऱ्यापासून एकमेव गाव गंगाजळी हे वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना बरेचदा अडचणींचा सामना करावा लागला तर अनेक विध्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात आल्यापावली घरी परतावे लागले त्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा झाले. सातत्याने होत असलेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व नागरिकांना होणाऱ्या अडचणी नियमित असताना कोणत्याही पुढारी, लोक प्रतिनिधी, प्रशासनाला दिसून आल्या नाही. शेवटी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मी व माझे सहकारी मित्र यांनी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी संवैधानिक मार्गाने १ नोव्हेंबर २०२२ रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला. व सातत्याने बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. त्यामध्ये शेतकरी संघटनेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळाला. याचीच फलश्रुती म्हणून ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आमदार निधीतून ३ लक्ष रुपयांचा प्रवाशी निवारा मंजूर झाल्याचे पत्र १ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार वानखडे, व सार्वजनिक बांधकाम येथील उपअभियंता वानखडे यांनी आंदोलनस्थळी आणून देत लवकरच प्रवासी निवारा तयार करून मिळेल असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या विनंती ला मान देत आंदोलन मागे घेतले...


त्यानंतर सुद्धा म्हणातात ना सरकारी काम आणि १० महिने थांब तीच प्रचिती या कामामध्ये दिसून आली जवळपास १ वर्ष लोटले असतानाही प्रवासी निवाऱ्याचे काम सुरु न झाल्यामुळे परत वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित केल्यानंतर डिसेंबर २३ मध्ये प्रवाशी निवाऱ्याचे काम सुरु झाले मात्र त्यामध्ये ३ लक्ष रुपयाचा निधी सुद्धा अपुरा पडत असल्याच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या त्याचे कारण असे कि, संपूर्ण बांधकाम ठेकेदारापासून एकेरी विटांमध्ये बांधण्यात येत होते. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्याने तसेच वेळोवेळी बातम्या - प्रकाशित केल्याने त्या ठेकेदाराला बांधकाम परत करावे लागले आणि योग्य प्रकारे त्या प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वास आले..

   

     आजच्या युगात कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासाठी मेहनत संघर्ष आणि जिद्दीपणा अंगात असायलाच पाहिजे त्याचे फळ वेळाने का होईना मिळतेच. सदरच्या कामात मला वेळोवेळी मदत करणाऱ्या सहकारी मित्राचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या सहकार्याशिवाय हे काम श्यक्यच नव्हते... कळत न कळत सहकार्य करणाऱ्याचे तसेच जवळ राहून विरोध करण्याचे सुद्धा मनस्वी आभार ज्यांच्या विरोधामुळे काम करण्यास एक वेगळीच ऊर्जा मिळाली..



                   सुरज उत्तमराव वानखडे

Post a Comment

Previous Post Next Post