प्रजासत्ताक दिनी अतिक्रमणांबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर करण्याचे रिपाइं (आठवले) चे आवाहन

 




मूर्तिजापूर - रिपाइं (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

यांच्या सुचनेनुसार २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनी 

ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत अतिक्रमणासंदर्भात काही ठराव मंजूर करवून घेण्याचे आवाहन रिपाइं (आठवले) चे तालुकाध्यक्ष अजय प्रभे यांनी केले आहे. 

     गायरान जमिनीवर निराधार भूमिहीन शेतमजूर दलित आदिवासी भटके विमुक्त गोरगरीब लोकांची शेतजमीनीचे तसेच घरांचे केलेले अतिक्रमण नियमित करणे, भूमिहीन बेरोजगारांना, ग्रामस्थांना ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय पडिक भुखंड कसण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मंजूर करणे हे दोन्ही ठराव मंजूर करवून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून हे दोन्ही ठराव वेगवेगळे असून ग्रामसेवक यांना ग्रामस्थांकडून करण्यात येणाऱ्या अर्जात अतिक्रमणधारकांची, लाभार्थ्यांची नावे टाकणे आवश्यक आहे, असे यासंदर्भातील निवेदनात अजय प्रभे यांनी नमुद केले आहे.

रिपाइं (आठवले) चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश संघटक सचिव सुमित वजाळे, सोशल मिडिया आय टी सेल चे प्रसिद्धी प्रमुख उमाजी सपकाळे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.


____________________________

तालुक्यातील गायरान जमीन धारक अतिक्रमणधारकांनी आपली उपजीविका भागविण्यासाठी केलेल्या अतिक्रमणाची दिनांक २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामसेवकाकडे ठराव घेण्यासाठी अर्ज सादर करा, जेणेकरून न्यायालयीन लढाई करिता आपल्या उपयोगी पडेल.

-सुनिल अवचार अकोला जिल्हाध्यक्ष रिपाइं (आठवले)

Post a Comment

Previous Post Next Post