तब्बल 88 मुले, 365,च्यावरती ठेवल्या गेलेल्या रखेली, महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या अय्याशी चे गोडवे गाणारी आहेत.
-----------------------------------------
लेखक-श्री तानाजी सखाराम कांबळे
8080532937.
-----------------------------------------
राजे आणि राजकारणी यांच्या अय्याशी बाजीच्या कथा इतिहासाच्या पानांमध्ये कोरून ठेवलेले आहेत लिखित स्वरूपात.महाराष्ट्राच्या ऐतिहासिक काळामध्ये पेशवा बाजीराव याच्या मस्तानी सोबतच्या रंगीन लीला प्रसिद्ध आहेत.अर्थातच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणी
मंडळी देखील याला अपवाद ठरले नाहीत.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ,हसमुख लाल म्हणून ओळख असणारे दिवंगत,तत्कालीन मुख्यमंत्री (स्वर्गीय) यांनी,
सांप्रत कोल्हापूरच्या एका पंचतारांकित हॉटेल वरती, सायंकाळच्या बैठकीला मुजरा करण्यासाठी अनेक वेळा खासगीत आगमन केले ची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मराठी सिनेचित्रपट सृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री यांच्यासोबत,काही सहाय्यक अभिनेत्री यांनी देखील या मुजरा कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याची चर्चा होती.
महाराष्ट्रामध्ये गाजलेलं बरखा मुंडे प्रकरण.
भाजप शिवसेनेने जानेवरी १९९५ मध्ये आपले सरकार स्थापन केल्यानंतर आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहीम काढली होती. त्या मोहिमेअंतर्गत त्यांनी तात्कालीन उपमु्ख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे
काही कागदपत्रं दाखल केले होते.त्या कागदपत्रात त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतिक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या
नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता.
त्यानंतर हे प्रकरण माध्यमात पसरलं गेलं आणि त्याची जोरदार चर्चा होऊ लागली होती. बरखा नावाची आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावणारी ही बाई कोण आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांना जनतेच्या आणि विरोधकांच्या टिकेला सामोरं जावं लागलं होतं. प्रकरण वाढल्यामुळे त्यांनी खुलासेही केले होते पण आरोप थांबले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी या दोघांच्या नावे फ्लॅट खरेदी करुन दिला असून ते पुण्यात आल्यावर त्या फ्लॅटवर आरामासाठी जातात असे आरोपही त्यांच्यावर झाले होते.
कोण होत्या बरखा पाटील ?
------------------------------------------
बरखा पाटील पुण्यातील चौफुला येथील राहणाऱ्या एक नृत्यांगणा (तमाशा कलावंत) होत्या. त्यांना एक मुलगा होता. आपल्या मुलाच्या आणि आपल्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावायच्या. बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यावरुन हा वाद निर्माण झाला होता पण बरखा पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते. आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मोहिमेंतर्गत सादर केलेल्या पुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
---------------------------------------
प्रकरणानंतर काय झालं?
या प्रकरणाची माध्यमांत आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली की त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती. या प्रकरणामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तीगत आणि राजकीय जीवनात प्रचंड त्रास झाला होता. या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत होत्या त्यामुळे हे प्रकरण खेड्यांपर्यंत पोहचलं होतं. त्यांच्यावर व्यक्तीगत आरोप लावल्यामुळे त्यांना काही लोकांपासून त्रासही झाला पण ते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना राजकीय टीका आणि रोषाला तोंड द्यावं लागलं होतं.कसं निवळलं प्रकरण
या घटनेनंतर काही दिवसांतच गोपीनाथ मुंडेंनी हे प्रकरण त्यांचे मित्र आणि जेष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या कानावर घातली. त्यावेळी गोपीनाथ यांनी "आमच्या लग्नातही आम्ही गाणेबजावणे करतो, माझ्या समाजात आणि गावात असं सारं चालतं....हे शहरी नियम आम्हाला कशाला लावता राव? अशी व्यथा त्यांनी द्वादशीवार यांना सांगितली. ‘तेव्हा सुरेश द्वादशीवार यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन एका चांगल्या होतकरू आणि स्वकष्टाने वर आलेल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याचा असा हिरमोड कशासाठी? असं समजावून सांगितलं. अण्णा हजारेंनी गोपीनाथ मुंडे यांना भेटायला बोलावलं व हे घुंगराचं प्रकरण अखेर संपुष्टात आलं.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्यापुढील राजकीय कारकिर्दीत बरखा बहार या घटनेचा पुन्हा अडथळा कधीच आला नाही.
-----------------------------------------
स्वातंत्र्य पूर्व काळातील इतिहासामध्ये,अनेक राजेरजवाडे यांचे वेगळेपण नमूद आणि नोंद झालेले आहे ते त्यांच्या अय्याशीपणामुळे!राजघराण्याच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली,अनेकांनी केलेले जास्तीचे विवाह,आपले जास्तीचे शौक भागवण्यासाठी ठेवलेल्या राजवाडा मध्ये रखेली,त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात होणाऱ्या संपत्तीची उधळण,आशा अय्याशीबाज राजे रजवाडे यांच्या नावावर ती कोरलेली आहे.
पंजाब मधील पटियाला या राजघराण्यातील महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या राजगादीच्या तब्बल 38 वर्षापर्यंत ची अय्याशी ची कहाणी थक्क करणारी आहे. जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर देखील,पटियाला चे महाराजे भूपेंद्रसिंह याच्यावरती बेहद खूष होता.महाराजा भूपेंद्रसिंह यांनी केलेले पाच राणीशी विवाह,त्यांना असणारी तब्बल 88 मुले, 365 त्याच्यावरती ठेवल्या गेलेल्या रखेली, महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या अय्याशी चे गोडवे गाणारी आहेत.
महाराजा भूपेंद्र सिंह यांना शिकारी करणे,घोडेस्वारी करणे,आणि सुंदरातील सुंदर स्त्रियांच्या बरोबर संभोग करणे,या तीन गोष्टींचा प्रचंड प्रमाणात शौक होता.
पटियाला च्या महाराणी व ठेवलेल्या रखेल यांची सुंदरता ची चर्चा आज देखील अभ्यासकांना चकित करणारी ठरत आहे.
महाराजा भूपेंद्रसिंह यांनी आपल्याला अय्याशी करण्याला स्वतंत्रता मिळावी याकरता, बांधलेल्या स्वतंत्र बंदिस्त महालामध्ये,दिवसा गणिक व रात्रीचे विवस्त्र होऊन नग्नावस्थेत नाचगाण्याचे कार्यक्रम सुरु असायचे.
राजा भूपेंद्रसिंह स्वतःही नग्नावस्थेत अशावेळी राजमहल आतून फिरत असल्याची नोंद, इतिहासकार जर्मनी दास याने त्याच्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आढळते.
त्याच्या त्या रंग महालातील,स्त्रिया अधिक अधिक सुंदर दिसण्यासाठी, राजा भुपेंद्र सिन्हा ब्युटीशियन, सोनार,प्लास्टिक सर्जन, यांना बोलावून खास पद्धतीने,अशा स्त्रियांची सजावट करून, त्यांना उपभोगत असे.पटियाला च्या महाराणी आणि त्याच्या ठेवलेल्या रखेली अर्थात पट्टराणी, यांच्या सुंदर ते विषयीच्या चर्चा आज देखील,देशभरामध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.
तब्बल 38 वर्षे पटियाला राजघराण्याची राजगादी सांभाळणारे महाराजा भूपेंद्रसिंह हे, या देशातील अय्याशी बाज राजे म्हणून ओळखले जातात.महागड्या गाड्या खरेदी करणे, सोने हिरे चांदी जडजवाहीर इत्यादी सह बावीस हजार कोटींची संपत्तीसह, तब्बल नऊ हजार एकराचे वरती जमिनीचे मालकी हक्क सांगणार्या या राजघराण्याचा, महाराजा,भूपेंद्र सिंह याने जनतेच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेवटचा व्हाईसराय याला याची कुणकुण लागताच एका ब्रिटिश अधिकाऱ्यांमार्फत पटियाला चे महाराजा भूपेंद्रसिंह यांचे चौकशी करून मांडलिकत्व का काढून घेऊ नये या अशा संदर्भाची नोटीस बजावली होती,मात्र तडजोडी-अंती हा विषय मिटला होता.