घराचे स्वप्न पूर्ण होणार कसे?
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी अजय डाखोरे
धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागात मोदी आवास योजना रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शासनाकडून गरजू गोरगरिबांना घरकुल साठी अनुदान देण्यात येत आहे परंतु या अनुदानापेक्षा बांधकामाच्या साहित्यात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे कर्जबाजारी होऊन घरकुलचे बांधकाम करत आहे त्यामुळे गोरगरिबांच्या घराचे स्वप्न कसे पूर्ण होणार असा प्रश्न घरकुल लाभार्थ्याकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागासाठी शासनाकडून घरकुल साठी लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळतात तर शहरी भागासाठी लाभार्थ्यांना दोन लाख 50 हजार रुपये देण्यात येतात ही फार मोठी ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे.
बांधकामासाठी लागणारे साहित्य ग्रामीण भागात स्वस्त भावात मिळते का असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे.
एक तर गाव खेड्यात वेळोवेळी अर्ज पाठपुरावा करून घरकुल मिळत नाही अशातच घरकुल मिळाले तर प्रशासनाकडून घरकुलचे हप्ते वेळोवेळी मिळत नाही आणि या अनुदानाची हप्ते मिळण्यासाठी लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयावर आपल्या जिजाबा लागतात.
सिमेंटचे दर रेतीचे दर विटाचे दर मजुरीचे मजुरी महाग झाल्यामुळे एवढ्या रुपयात घर कसे बांधायचे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे.