नांदेड : महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंती समारोह दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी नांदेड येथे शुभारंभ मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. हनुमंत रिठे व कार्यक्रमाचे उदघाटक माजी आमदार संतोष टारफे होते,तसेच प्रमुख मार्गदशक डॉ.हमराज उईके, स्वागत अध्यक्ष डॉ बळीराम भुरके होते. प्रमुख पाहुणे माजी मंत्री डी. पि. सावंत साहेब तसेच मा.आ. अमर राजूरकर साहेब व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश महिला अध्यक्ष नंदिनी टारपे होत्या.
नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून किनवट, हदगांव, भोकर, हिमायत नगर आदी तालुक्यातील आदिवासी समाज आजही दऱ्या खोऱ्यात रहात असून विकासा पासून कोसो दूर आहे, हा समाज मुख्य प्रव्हात यावा त्या अनुषंगाने नांदेड येथे बिरसा मुंडा जयंती समारोह निमित्याने समाज प्रबोधनचा कार्यर्क्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी आरक्षण बाबत बोलत असताना म्हणाल्या की धनगर,बंजारा,धोबी,भोई,राजपुत आणि आता वडार बांधव हे सर्व जण आदिवासींचे आरक्षण रस्त्यावर उतरून मागत आहेत .आपण मात्र खरे आदिवासी शांत बसलो आहोत, याबाबत आरक्षण मागणाऱ्या समाजाला पाहिजे तसा विरोध करण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही . या समाजाच्या आरक्षण मागणाऱ्याला विरोध करण्यासाठी आधी राजकीय पुढारी व नोकरदार वर्गाने पुढे आले पाहिजे. आपण अशिक्षित आदिवासी बांधवाकडून याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.कारण आरक्षणाचा अर्थ शिक्षित आदिवासी समाजाला समजला नाही.अशिक्षित आदिवासीला कसा समजेल?जातीय फायदा घेऊन जे पुढारीसमोर आले,समाजभूषण झाले,या वर्गाने समाजाच्या उन्नती केली पाहिजे होती.आरक्षण वाचवण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न केलेले दिसून येत नाही.असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या तसेच आदिवासी आरक्षणाच्या रक्षेची जबाबदारी ही अशिक्षित आदिवासीवर नसून राजकीय लाभ घेणारे पुढारी व नोकरदार वर्गाची आहे.यावेळी माजी मंत्री सावंत साहेब यांनी नांदेड शहरामध्ये बिरसा मुंडा यांचे स्मारक असणे गरजेचे आहे, तसेच आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहेत असेही आपल्या भाषांनातून मत व्यक्त केले.यावेळी मा. आ. डॉ संतोष टारपे विचार मांडले व अध्यक्षयी भाषण डॉ. हनुमंत रिठे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. बळीराम भुरके यांनी केली.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड येथील कर्मचारी बांधवाने व आदिवासी युवक परिश्रम घेतले.