मूर्तिजापूर - शासनाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मूर्तिजापूर येथील क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले होते त्यात बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदवत विजेता पदाची परंपरा कायम ठेवली आहे.
मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत सन २०२३ -२४ तालुका स्तरीय बालक्रीडा स्पर्धा तहसील क्रिडा संकुल मैदानावर पार पडल्या ज्यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा बिडगाव या शाळेने सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा तालुका चॅम्पियन वर विजय मिळवत क्रीडास्पर्धत दबदबा निर्माण केला. सिनियर मुले कबड्डी,खो खो,क्रिकेट, लंगडी या सर्व सांघिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळविले.वैयक्तिक स्पर्धेत सर्वच क्रीडा प्रकारात विजयश्री मिळविली व जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी सुद्धा पात्र ठरली आहे यासाठी विजेत्या संघाला उपस्थीत मान्यवर गटविकास अधिकारी अशोक बांगर, गटशिक्षणाधिकारी डॉ. नसिरोद्दीन अंसार , शिक्षण विस्तार अधिकारी संजय मोरे ,क्रीडा समन्वयक कैलास सोळंके यांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मुख्याध्यापक अनिल महाजन, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी.एन इंगळे यांचे मार्गदर्शनात प्रदिप मेहर,सतीश सोळंके,गजानन शिंदे, कु.गवई मॅडम या सर्व शिक्षकांनी विजयासाठी परिश्रम घेत यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले.