श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी दिन साजरा

 



       प्रतिनिधी - सुरज वानखडे

 

 धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी दिन अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शेतकरी दांपत्याच्या पुतळ्याचे पूजन करून जय जवान जय किसान तसेच अन्नदाता सुखी भव असे नारे देऊन जयघोष करण्यात आला. शेतकरी दिनानिमित्त संचालक राधेश्याम चांडक व गिरीश भुतडा यांचे कडून शेतकरी बंधूंना अन्नदान करण्यात आले.

       यावेळी कार्यक्रमाला उपस्थित बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे, माननीय उपसभापती मंगेश बोबडे, संचालक दिनेश जगताप, देवराव बमनोटे, राधेश्याम चांडक, गिरिश भूतडा बाजार समितीचे सचिव प्रवीण वानखेडे, दिनेश गोमासे, संजय तूपसुंदरे, राजू तायडे, नाना गाडेकर, नितीन मांडवगने व इतर कर्मचारी बंधू, तसेच व्यापारी बंधू शेतकरी, बंधू हमाल, बंधू मापारी कार्यक्रमाला उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post