चोहोट्टा बाजार प्रतिनिधी :- अमोल राणे
अकोट -अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार नजीक करोडी फाट्या मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, या रस्त्यावरील काम राहिलेल्या ठिकाणी प्रचंड धूळ व वाहनांमुळे उडणाऱ्या दगडांमुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवा लागते. या अवस्थेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आरोग्यास व जिवित्वात धोका निर्माण झाला आहे या सणासुदीच्या काळात त्या रस्त्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे या रस्त्याने रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थी, या रस्त्याने अनेक प्रवाशांची ये-जा असते, या रस्त्याची पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा या पुलावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने,प्रहार शेतकरी आघाडी उपजिल्हाध्यक्ष जीवन खवले यांनी दिवाळीच्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात येईल यांनी निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना मागणी केली तसेच काम होईपर्यंत या रोडवरील धूळ पाणी मारून आटोक्यात आणावी असेही सुचविले आहे.