उटण्याचा पवित्र सुगंध घेऊन, आली दिवाळीची पहाट, शिवसेनेच्या मशालीच्या तेजाने, उजळेल महाराष्ट्राची वहिवाट !!
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम
शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष, युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व दिवाळीनिमित्त मोफत सुगंधी आयुर्वेदिक उटणे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आदरणीय शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे संपन्न झाला. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख महेश सावंत, महिला विभागसंघटक, माजी महापौर श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, वसंत नकाशे, ॲड. मेराज शेख, शाखाप्रमुख हमीद शेख आदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.