भव्य यात्रा महोत्सव निमित्ताने महाशिवपुराण कथा व किर्तन महोत्सवाचे आयोजन

 





चोहोट्टा बाजार प्रतिनिधी : - दसरा दिवाळी आली की चोहोट्टा बाजार पंचक्रोशीतील भाविकांना अतुरता लागते ति म्हणजेच कार्तिकी एकादशी सोहळ्या निमित्ताने भव्य यात्रा महोत्सव तसेच किर्तन महोत्सवाची.

दसरा दिवाळी तोची आम्हा सन!

सखे संतजन भेटतील!!


चोहोट्टा बाजार पंचक्रोशीतील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन तसेच कार्तिकी एकादशी निमित्त भव्य यात्रा महोत्सव चे आयोजन करण्यात येत असते. वारकरी संप्रदाय मध्ये आषाढी कार्तिकी चैत्र आनी माघ अशा चार वारी करने वारकर्याना आवश्यक असते चार वार्या करने आजच्या काळात प्रत्येकाला शक्य होत नसते त्यामुळे बहुतांश वारकरी आषाढी एकादशी ला पंढरपूर ची वारी करतात तर कार्तिकी एकादशीला पंढरपुर चोहोट्टा बाजार नगरी मध्ये अवतरते मग संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥

तेथे असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥ असा अद्भुत देव संत आनी भजनाचा संगम हा अनुभवायला मिळते.


या वर्षी चोहोट्टा बाजार येथे आयोजित भव्य यात्रा महोत्सव निमित्ताने शिवमहापुराण कथा तसेच किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवमहापुराण कथा वाचक म्हणून  श्री १००८ स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरी महाराज काशी विश्वनाथ मंदिर ऊगवा आश्रम यांच्या मुखातून दिं. १७/११/२०२३ शुक्रवार पासुन शिवकथा ऐकायला मिळणार आहे. तर कार्तिकी एकादशीला गुरुवार दिं २३/११/२०२३ सायंकाळी ०५:०० वाजता भव्य अशी नगरप्रदक्षिणा होणार आहे. शुक्रवार दिं.२४/११/२०२३ शुक्रवार ला सकाळी होम हवन होऊन १० वाजता काल्याचे किर्तन  श्री १००८ स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरी महाराज यांचे होऊन नंतर महाप्रसाद वितरण होणार आहे.रात्री ०८:०० वाजता ह.भ.प.संतोष महाराज भालेराव यांचे एकनाथी भारुडाने सप्ताहाची सांगता होणार आहे.


या सप्ताहातील किर्तन महोत्सवा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आपली सेवा देणार असुन शुक्रवार दिं.१७नोव्हे दिं.रामभाऊ महाराज ऊन्हाळे शेगाव, शनिवार दिं.१८ नोव्हेंबर भरत महाराज चौधरी जळगाव, रविवार १९ नोव्हेंबर मंगेश महाराज वराडे दाताळा, सोमवार दिं २० नोव्हेंबर प्रसिद्ध शिवव्याख्याते सोपान महाराज कनेरकर मोर्शी, मंगळवार दिं.२१ नोव्हेंबर शब्द प्रेमी संग्राम बापु भंडारे आळंदी देवाची, बुधवार दिं.२२ नोव्हेंबर स्वररत्न महेश महाराज हरवने जालना, गुरुवार दिं.२३ नोव्हेंबर गुरुवर्य पंकज महाराज पवार आळंदी देवाची यांचे किर्तन सेवा राहणार असून मृदंगाचार्य ऊमेश महाराज वाघ मोरगाव, गायनाचार्य विठ्ठल महाराज देशमुख कोद्री,विजय महाराज हंतोडे शेगाव,रवी महाराज खडसने सांगवी हिवरे तर श्रीं चे टाळकरी श्री संत गजानन महाराज भजनी मंडळ हनवाडी यांचे सहकार्य लाभणार आहे. भव्य यात्रा महोत्सव समिती चोहोट्टा बाजार पंचक्रोशीतील भाविक भक्त सर्व ग्रामस्थ चोहोट्टा बाजार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन भाविक भक्तांनी या हरिनाम सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान, यात्रा महोत्सव आयोजक समिती चोहोट्टा बाजार च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post