प्रतिनिधी, शशांक चौधरी -
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात प्रा. अतुल सरोदे यांच्या कार्यकारी अध्यक्षतेखाली पार पडलेल्या इंग्रजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निलेश अरविंद तारे यांची सर्वानुमते निवड झाली तदनंतर प्रा. डॉ. निलेश अरविंद तारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या शाखेवर प्रा. डाॅ. प्रशांत ठाकरे यांची निवड झाली.
आणि अभ्यास मंडळावर स्विकृत सदस्य म्हणून प्रा. डाॅ. अजय अभ्यंकर, प्रा. डाॅ. इंदल जाधव, प्रा. डाॅ. सुधीर चव्हाण, प्रा. डाॅ. सूरजप्रसाद शुक्ला तर इतर विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून प्रो. डाॅ. संतोष पु. राजगुरे यांची बिनविरोध निवड झाली. 48/3 वर प्रा. डाॅ. भारती पटनाईक, प्रा. अतुल सरोदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.