चंद्रपूर,अमृत कुचनकर विशेष प्रतिनिधी राजुरा -: गुप्त सूचनेचा आधारावर जुगार अड्ड्यावर डी. बी. पथकाने धाड टाकून सहा आरोपी सह 3 हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
राजुरा शहारातील स्वामीच्या वाडी मागे मोठ्या स्वरूपात जुगार जवळपास एक दोन महिन्यापासून खेळाला जात आहे अशी गुप्त सूचना पोलिस विभागातील डी. बी.पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी व्यूहरचना आखली माञ या धाडीची सूचना जुगार खेळणाऱ्या लोकांना देण्यात आली. त्यामुळे मोठे मासे पळून जाण्यास यशस्वी झाले. काही लहान जुआरी यांना अटक करण्यात आले. अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आरोपीचे नाव 1) अब्दुल मुखत्यार अब्दुल गफार वय 45 रहा. भारत चौक राजुरा .2) प्रवीण विठ्ठल वाटेकर वय वय 35 .3) सीताराम देवाजी ठाकूर वय 35. 4) मल्लेश नागांना यामुलवार वय 55
5) शमशोद्दिनन इम्मामोद्दिन सय्यद
6) शाहिद नसीम अहमद वय 30 रहा. इदिरा नगर राजुरा12( अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. या डी. बी पथक मध्ये धमेंद्र जोशी ऐ .पी.आय., वडस्कर, आणि इतर कर्मचारी सोबत होते.