• पंचायत समितीच्या सभागृहात निरोप समारंभ
चंद्रपूर / चिमूर , सुनिल कोसे: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानात चिमूर पंचायत समितीला क्षमता बांधणी व्यवस्थापक म्हणून प्रशांत मडावी हे कार्यरत होतें त्याची बदली नागभिड येथे झाली तर नेरी विभागाच्या प्रभाग समन्वय सारीखा बाहुरे मॅडम यांना चिमूर तालुका उमेद कॅडरच्या वतीने त्यांना पंचायत समितीच्या सभागृहात निरोप देण्यात आला . यावेळी महीलाना अश्रू अनावर झाल्याचा प्रसंग बघावयास मिळाला.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक राजेश बारसागडे,मेघदिप ब्राम्हणे,धारणे,रजनी खोब्रागडे, हेमचंद्र बोरकर, ईश्वर मेश्राम ,किरण मेश्राम, दिपाली दोडके,सपना उराडे चिमूर तालुक्यातील संपूर्ण कॉडरच्या उपस्थित निरोप देण्यात आला.
तालुका उमेद अभियानात कक्षात प्रशांत मडावी हे २०१३ पासून क्षमता बांधणी व्यवस्थापक म्हणून काम करीत असुन तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचून बचत गट स्थापन करण्या बाबत जनजागृती मार्गदर्शन करुन सर्व कॅडरच्या मनात घर केल्याने जिव्हाळा निर्माण झाल्याने निरोप समारंभात महीलाचे डोळे भरून आले होते.महीलानी अश्रूंना वाट मोकळी केली होती हे विशेष.