महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला नागरी सह पतसंस्था बाबूंपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने जगतिक पर्यावरण दिनानिमित्य वृक्षारोपन

 




पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक तरी झाड लावा-डॉ.जयश्री ठाकरे (दंतरोग तज्ञ)





चंद्रपूर, सुविद्या बांबोडे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्य महिला बचत गट, तसेच रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्षा चंदा वैरागडे यांच्या नेतृत्वात स्थानिक बाबूपेठ परिसरातील स्मश्यान भूमी परिसरात वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी डॉ.जयश्री ठाकरे उपस्थित होत्या.यावेळी बाबूपेठ स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारचे वृक्षाचे रोपांन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.ठाकरे यांनी आज पर्यवरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकानी आपल्या जीवनातील महत्वाच्या दिवशी जसे तुम्ही भव्य समारंभ करता त्याच वेळी तुम्ही किमान एक तरी वृक्ष लावा.तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपले जीवन सुंदर बनवू शकतो. असे मौलिक विचार व्यक्त केले.अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला पतसंस्था च्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपण कार्यक्रम असून आज आपण बघतो आहे.

    माणूस स्वतःच्या स्वार्था पोटी वृक्षतोड करीत असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते त्यामुळे दैनंदिन जीवनात विविध आजाराला आपण निमंत्रण देतो हे जर टाळायचे असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपन करून त्याचे संगोपन करावे असे आव्हान केले.वृक्षरोपन कार्यक्रमाला नम्रता मोरे, सुरेखा कुणारपवार,सुवर्णा भारस्कर,रत्ना खनके,स्नेहल अंबागडे,शीतल लेडांगे,शुभांगी कंदिकुरवार,शमी बिट्टे,ज्योती खोब्रागडे,वैशाली येसेकर,ज्योती खनके,तृप्ती जगनाडे,रिता खनके,रोशनी राजूरकर,छाया चिकटे,रजनी मडावी,शीतल देठे,उजवला कारलेवार,कविता बावणे,पूजा कारलेवार,जयश्री जाधव,शीतल गिन्नलवार,अपर्णा धकाते,रुपाली बुटले, तुलसी लिपटे,स्नेहा कोलारकर,संतोषी कन्नूर,प्रियंका वैरागडे,सुषमा उमरे,सुरेखा बुटले, तृप्ती राजूरकर,संगिता वैरागडे,लीला बुटले,वंदना खेडकर,सुनीता शहारे, अंजु वैरागडे, स्नेहल कोलारकर,आदी महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post