जागतिक पर्यावरण दिवसाच्या पर्वावर " माझी वसुंधरा माझे कर्तव्य " अभियानाचे मूर्तिजापूरात उद्घाटन




जागतिक पर्यावरण दिवसाच्या पर्वावर " माझी वसुंधरा माझे कर्तव्य " अभियानाचे मूर्तिजापूरात उद्घाटन  






मूर्तिजापूर - नेहरु युवा केंद्र अकोला ( युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार ) द्वारा संचालित नेहरु युवा मंडळ मुर्तिजापूर व तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय " माझी वसुंधरा माझे कर्तव्य " या अभियानाचे उदघाटन " तिक्ष्णगत " संचालक तथा अध्यक्ष सुगत वाघमारे याच्या हस्ते पार पडले.

         तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी अकोला च्या मुर्तिजापूर येथे लवकरच सुरु होणाऱ्या कार्यालयाच्या प्रागणांत संपन्न झालेल्या आणि अनिल डाहेलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच विष्णुदास मोंडोंकार यांच्या मार्गदर्शनात उदघाटीत " माझी वसुंधरा माझे कर्तव्य " या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृक्षारोपणासाठी वृक्ष जगविण्यासाठी स्वतः सकाळ संध्याकाळ परिश्रम घेवून शेकडो वृक्ष जगविणारे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे , उदघाटक म्हणून व नुकताच दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले " तिक्ष्णगत " चे संचालक व अध्यक्ष सुगत वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितिचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे , जेष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब तायडे , अभियानाचे मार्गदर्शक विष्णू दास मोंडोंकार , ग्रामिण भागातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल सरदार , युवा तडफदार व्यक्तिमत्व व विदर्भ जन आंदोलन समिती चे तालुकाध्यक्ष अरविंद तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.नुकतेच दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुगत वाघमारे यांचा आणि वृक्षारोपणात अतुलनीय असं कार्य करणारे द्वारकाभैया दुबे यांचा सत्कार नेहरु युवा मंडळ मुर्तिजापूर च्या वतिने करण्यात आला. 

     यावेळी आपल्या उद्घाटनीय भाषणात सुगत वाघमारे यांनी 

 " माझी वसुंधरा माझे कर्तव्य" या अभियानास शुभेच्छा देत मार्गदर्शन करताना तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम अखंडित ठेवून वृक्ष लागवडी सह संगोपन संवर्धनासाठी प्रयत्नरत असेल अशी ग्वाही दिली. तसेच अनिल डाहेलकर यांनी वृक्षारोपण यासाठी प्रक्रिया केलेले सिडबाल ( Seedboll ) तयार करुन सहज चालता फिरता या नव्या संकल्पनेचे कौतुक केले . 

  या कार्यक्रमात भारंबे सर ,अमित खांडेकर , श्रिकांत पिंजरकर , बाबि पळसपगार , विजय जामणिक , बॉबी सिरसाट, मिलिंद तायडे ,प्रमोद वानखडे , गजानन करडे, अनिल खंडारे , प्रमोद पंत , मनोज मालधुरे ,विजय गवई ,रवि चौधरी ,सुरेश थाटे , प्रेमदास समदुरे,गजानन तायडे , सुनिल खंडारे , बाळासाहेब खंडारे,निलेश चहाकर,आदित्य वानखडे , पेंटर थोरात, इम्रान भाई, अख्तर भाई,रवि चौधरी, बाळुभाऊ गवई उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कलाविष्कार चे संस्थापक मिलिंद इंगळे यांनी केले तर आभार हर्षदा डोंगरे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post