समाधान शिबीरात असमाधान !

 






वाशिम जिल्हा प्रतिनिधी कैलास बनसोड



 वाशिम जिल्ह्यामध्ये 22 जानेवारी 2023 रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले परंतु आचारसंहितेमुळे समाधान शिबीर होऊ शकले नाही. असे असतानाही समाधान शिबिरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तक्रारीचा डोंगर तयार झाला आहे सदर व तक्रारी तालुका लेवलला तहसीलदार यांना निकाली काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही तक्रारीचा निपटारा झाला नाही आणि तक्रारदार कोणताही समाधानी नाही म्हणून समाधान शिबिर हे कोणाच्या समाधानासाठी होते असा तक्रारदार प्रश्न करीत आहे. लोकशाही कार्यपद्धतीमुळे समाधान शिबिर हे अतिशय महत्त्वाचं शिबीर मानले जाते आणि या शिबिरामुळे माननीय संजय राठोड पालकमंत्री यांना जिल्ह्यातून स्तुत्य उपक्रमाच्या शुभेच्छा दिल्या जातात समाधान शिबिर हे दर तीन महिन्याला आयोजित करावं असं तक्रार करत्या नागरिकाचे म्हणणे परंतु याच शिबिरामध्ये आजपर्यंत कोणताही निकाल लागला नसल्याकारणामुळे जबाबदार अधिकारीच कायद्याची पायमल्ली करीत आहे.त्यामुळे समाधान शिबिरात अर्जदाराचे असमाधान असल्याचं दिसून येते म्हणून




खाते प्रमुखांनी  लक्ष देण्याची मागणी होत आहे आणि ज्या टेबलवर ज्या कर्मचाऱ्याकडे ह्या फाईल बंद आहेत अशा कर्मचारी विरुध्द जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा विशेष लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे.

याबाबत मालेगाव तहसील मधून दाखल करण्यात आलेल्या समाधान शिबिरातील तक्रारी संदर्भात गजानन काळे व सुनील शर्मा यांनी तक्रारी दाखल केले आहेत त्यांचे शी संपर्क साधला असता सुनील शर्मा व गजानन काळे यांनी असे सांगितले की ज्या आम्ही तक्रारी केलेले आहे त्या तक्रारी मोठ्या भ्रष्टाचाराच्या आहेत अपराचे आहेत त्यामुळे आम्ही समाधान शिबिरात सदर तक्रार दाखल केले तर त्या तक्रारीनुसार कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी माननीय संजयजी राठोड पालकमंत्री वाशिम व जिल्हा अधिकारी यांनी पावले उचलून भारतीय दंड संहिता 1860 च्या अंतर्गत दिलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कार्यवाही व्हायला पाहिजेत असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post