ग्रामविकास अधिकारी अशोक लहाने यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार



विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 


मूर्तिजापूर - पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत जामठी बु येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा दिलेले अशोक लाहाने हे नियत वयमानानुसार सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार व निरोप देण्यात आला.

 अशोक लहाने हे मुर्तिजापूर पंचायत समितीला गेल्या 2000 पासून कार्यरत असून त्यांच्या सेवाकाळात त्यांनी ग्रा.प. मोझर येथे सन 2006 मध्ये निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला, तसेच ग्रा.प. बिडगावला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय प्राप्त करून देण्यात मोठे योगदान आहे व 2011 मध्ये ग्रा.प. बिडगाव व मोझर येथे पर्यावरण संतुलीत समृद्ध गाव पुरस्कार प्राप्त करून दिला तद्वतच त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याचा जिल्हा प्रशासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला त्याच प्रमाणे मुर्तिजापूर पं.स. येथे कार्यरत असतांनां ग्रामसेवक संघटनेचे सातत्याने दोन वेळा अध्यक्ष पद भुषविले. या प्रमाणे सेवा देऊन ग्रा. पं. जामठी. येथून सेवानिवृत्ती घेतली..





त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार व निरोप प्रसंगी ग्रा. प. सरपंच अर्चनाताई तायडे ,उपसरपंच विकास गुल्हाने मा.सरपंच नंदु राऊत, ग्रा.प. सदस्य कीशोर तायडे, संदीप तायडे मनोज तायडे अंगणवाडी सेविका ग्रा. प. सचिव अमित कुरूमकर व ग्रा. प. कर्मचारी तथा संघनक चालक महेश गुल्हाने व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमित कुरूमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदु राऊत मा. सरपंच तथा ग्रा. प. सदस्य यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post