राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान व शेतकरी नेतृत्व मा. प्रकाशदादा साबळे यांच्या गेल्या 17 वर्षापासून अविरत सुरू असलेल्या शेतकरी गौरव सोहळ्यास राज्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद व सहभाग



 राज्यातील प्रगतिशील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा राजीव गांधी कृषी सन्मान सप्ताह चा सांगता समारोह रोजी डहाणू येथे संपन्न...




दि.21मे 2023 भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी नागपूर येथून शेतकरी गौरवाची सुरुवात होऊन दि. 28 मे 2023 रोजी डहाणू जि. पालघर येथे संपन्न...




राज्यातील कानाकोपऱ्यातील गावातील शेतकऱ्यांचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रेरणा ठरावी यासाठी हा उपक्रम =प्रकाश साबळे अध्यक्ष राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान


फळ बागायतदार शेतकऱ्यांनी परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करणे व वाढती महागाई मजुरांचा अभाव प्रचंड लागवडी लागत बाजार भावामध्ये असणारी तफावत त्यामुळे त्रस्त झाल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध आखणी करणे गरजेचे = मुजफ्फर हुसेन प्रगतिशील शेतकरी


राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सन्मान सोहळा डहाणू येथे थाटात संपन्न..


डहाणू येथील प्रगतिशील फळबागायतदार प्रवीण बारी व सातारा येथील अजिंक्यतारा सात्विक फार्मर ऑरगॅनिक प्रोडूसर कंपनी यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार बहाल...


दि.28/05/23 रोजी ता. डहाणू येथील चिकूच्या फळबागेत झालेल्या शेतकरी सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष मुझफ्फर हुसेन माजी आमदार, प्रमुख अतिथी म्हणून डहाणू येथील प्रगतिशील शेतकरी व महाराष्ट्र शासनाच्या उदयान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी  विनायक बारी व ओम साई चिकू फळबागायतदार शेतकरी गटाचे अध्यक्ष देवेंद्र राऊत, प्रकाश पाटील, समीर वर्तक तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे तसेच राहुल तायडे, अनुल्ला खान आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.


प्रवीण बारी व अजिंक्यतारा फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष विक्रम कदम सातारा यांचा सहपरिवार, सहपत्नीक मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व राजीव गांधी प्रतिमा देऊन सन्मान करून राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.


याप्रसंगी पिंकी नहार, दीपक राऊत, स्नेहल पोतदार, भरत भाई व परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post