थांबता थांबे ना पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार

महाराष्ट्र, धामणगाव रेल्वे गावाकडची बातमी



पाटबंधारे विभागाला अंगणवाडीचे स्वरूप..





अमरावती, धामणगाव रेल्वे : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत उपविभागीय अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र. 4, धामणगाव रेल्वे कार्यालयात शासकीय कार्यालयाची शिस्त व गोपनीयता धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयात लहान मुलांचा मुक्त वावर असल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 नुसार शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक कागद हा सार्वजनिक अभिलेख मानला जातो. नागरिकांकडून कार्यालयात दाखल होणारे अर्ज, तक्रारी, निवेदने व इतर दस्तऐवज हे संवेदनशील अभिलेख असतात. अशा अभिलेखांचे जतन व सुरक्षितता राखणे ही संबंधित कार्यालयाची जबाबदारी असते.

मात्र संबंधित कार्यालयात कार्यालयीन शिस्तीचे पालन होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लहान मुलांच्या वावरामुळे अभिलेखांचे नुकसान अथवा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय कार्यालयाला खासगी घराचे स्वरूप प्राप्त होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्त, जबाबदारी व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. संबंधित प्रकार गंभीर स्वरूपाचा असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

YouTube Link 

https://youtu.be/X2o7nLj9miM?si=Tf9heZppOq9TUn0T

Post a Comment

Previous Post Next Post