“बोगस डॉक्टरांचा वाढता सुळसुळाट; नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ”
कारला " गावातील वर्षानुवर्षे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस बंगाली डॉक्टरांना आशीर्वाद कोणाचा..?
अमरावती चांदूररेल्वे: चांदूररेल्वे तालुक्यातील कारला या गावी रुग्णाच्या जीवाशी खेळणारा बोगस बंगाली डॉक्टर सुजल समर बिश्वास असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील कारला गावी कोणतीही डिग्री नसलेले बोगस बंगाली डॉक्टर बिनधास्तपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायत प्रशासनाला शासनाचे आदेश असतानाही कारवाई करणार का..?
• महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परवानगी नसताना उपचार, सलाईन, इंजेक्शन आणि औषधोपचार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येतात.
• जर ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार, पुरावे आणि नागरिकांच्या तक्रारी असूनही कारवाई होत नसेल, तर संबंधित ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
" कारला " गावातील वर्षानुवर्षे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस बंगाली डॉक्टरांना आशीर्वाद कोणाचा..?
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही. तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टरच्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कारला या गावात बोगस बंगाली डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत. या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सचिव, सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी कोणतेही प्रयत्न करत नसल्याची अनेक वर्षांपासून कारला गावातील नागरिकांची तक्रार असून अश्या डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांना ग्रामपंचायत सचिव पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप देखील या भागातील नागरिकांनी केला आहे.


