पुणे (प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल, नवी सांगवी, पुणे .येथे मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. प्रारंभी श्रद्धांजली ठराव गजानन समंग यांनी मांडला, विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन महासचिव श्री रामचंद्र निमणकर यांनी केले.
या सभेत पुणे देवांग कोष्टी समाज अध्यक्ष श्री सुरेशराव तावरे यांचे मिटिंग नियोजनाबद्दल सत्कार मंडळ कार्याध्यक्ष श्री प्रकाशराव कांबळे यांचे शुभहस्ते व फलटण कोष्ठी समाज अध्यक्ष श्री अमोल कुमठेकर यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार मॅनेजिंग ट्रस्टी श्री अंकुशराव उकार्डे यांचे हस्ते करण्यात आला. त्यांनी सत्कारस उत्तर दिले. त्या प्रसंगी महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाचे ट्रस्टी श्री अरविंद तापोळे व निमंत्रित ट्रस्टी श्री किरण तारळेकर यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची आपली मते मांडून समाज संघटित करण्याचे आव्हान केले.
यावेळी इचलकरंजी येथील चौंडेश्वरी युवा संघटनेचे माजी अध्यक्ष,- प्रशांत सपाटे यांनी इचलकरंजी येथे आर्थोपेडिक सेंटर उभारण्यात मदत केल्या बद्दल महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ चे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून, चौंडेश्वरी मंदिर भेटी व कोष्टी समाज संपर्क अभियान चे कौतुक केले. कोल्हापूर देवांग समाज चे अध्यक्ष व मंडळाचे निमंत्रित ट्रस्टी- श्री राजेंद्र ढवळे, यांनी महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाच्या कार्याचे कौतुक करून समाजाची जनगणना करावी असे प्रतिपादन केले. पुणे देवांग समाज अध्यक्ष सुरेश तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून समाज विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष- श्री प्रकाशराव सातपुते .यांनी राज्यभर केलेल्या दौऱ्याचे महत्व विषद करून अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले .व शेवटी आभार प्रदर्शन श्री दत्ता ढगे यांनी मानले नंतर सभेची खेळी मेळीच्या वातावरणात सांगता झाली. सभेस मंडळाचे , ट्रस्टी -उत्तमराव म्हेत्रे,,निमंत्रित ट्रस्टी -श्री विश्वनाथ पोयेकर, इ.मान्यवर तसेच कार्यकारीणी सदस्य -श्री मिलिंद कांबळे, मनोज खेतमर,शीतल सातपुते,श्री दिलीप भंडारे,नंदकुमार टेके, सुनील म्हेतर,सचिन नाकिल, भाऊ मकोटे,अनिल भंडारे,सौ राजेश्री धुमाळे,इ .मान्यवर निमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.