जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून सांगोला नगरपालिकेसाठी ३ कोटी १८ लाख रुपये मंजूर - शहाजीबापू पाटील

 



सांगोला : सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या जिल्हास्तर योजनेतून सांगोला नगरपालिकेच्या सात कामांना मंजुरी मिळाली असून या सात कामांसाठी ३ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

१) देशमुख वस्ती ते प्रशांत देशमुख‌ वस्ती रस्ता करणे -११ लक्ष.

२) तेली ताल भोकरे वस्ती कॉर्नर ते उत्तम बुरांडे घरापर्यंत रस्ता करणे -२८ लक्ष.

 ३) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर बगीचा विकसित करणे -३३ लक्ष.

 ४) ढोले मळा ते मोरे मळा रस्ता करणे -६५ लक्ष.

५) मोरे मळा ते कोपटे वस्ती रस्ता करणे -६७ लक्ष.

६) विजय गुजर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे -६० लक्ष.

७) रावसाहेब देशमुख घरापर्यंत रस्ता करणे -५३.५० लक्ष.

अशा एकूण सात कामांसाठी ३ कोटी १८ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

सांगोला नगरपालिकेच्या प्रत्येक वाडी वस्तीसाठी डांबरीकरणाचे रस्ते तयार केले जातील यासाठी भरघोस निधी उपलब्ध करू असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. लवकरच दलित वस्ती सुधार योजनेतील विकास कामांना दीड कोटी व दलीतेतर योजनेतून सांगोला शहरात वाड्या वस्त्यांसाठी सुमारे ३७० स्ट्रीट लाईटचे पोल उभा करण्याच्या कामाला ५५ लक्ष रुपये मंजूर होणार आहेत अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post