चारही जनावरे पुंडलीक महाराज गौरक्षण संस्थेच्या ताब्यात
मूर्तिजापूर - शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोशनपुरा या भागात ५० वर्षीय व्यक्ती हा चार गुरांना कत्तलीसाठी बांधून ठेवून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठत निदर्यपणे बांधून ठेवलेल्या गुरांना पुंडलीक महाराज संस्थेच्या ताब्यात देखरेख व संगोपनासाठी दिल्याची घटना गुरुवारी १९ डिसेंबरच्या रात्री समोर उघडकीस आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजीत जाधव यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून शहरातील रोशननगर येथे अब्दुल जब्बार अब्दुल शहीद वय ५० वर्ष याच्या गोठ्यामध्ये ४ गोवंश कत्तल करण्याकरिता बांधून ठेवले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने उपनिरीक्षक आशीष शिंदे व सहकारी पंचासमक्ष घटनास्थळी गेले असता आरोपीच्या गोठ्यात चार गोवंश जातीचे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने बांधुन ठेवलेले दिसून आले . किंमत १ लाख ५ हजार सदर गोवंशाचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले , जनावरे कोठून आणली याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली.
सदर गोवंश हे कत्तली करण्याकरिता आणल्याचे खात्री झाल्याने नमूद गोवंश पुढील संगोपन व देखरेख करिता पुंडलिक महाराज गौरक्षण संस्था यांचे ताब्यात देण्यात आल्यावरून आरोपी विरुद्ध कलम ५,५(अ),५(४)महा ९,९(अ) महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम १९७६(सुधारणा अधि २०१५ ), कलम ११ , प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध सहकलम ११९ या कलमान्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहे .