मूर्तिजापूर - दिनांक 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जात असून यावर्षी दि.19 ते 24 डिसेंबर
2024 या कालावधीत सुशासन सप्ताह आयाोजित करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने दि.19 डिसेंबर 2024 रोजी
ग्रामपंचायत माना येथे कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत नागरीकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
यामध्ये नागरीकांच्या ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी सुशासन सप्ताहांतर्गत ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त उपयोग करुन आवश्यक त्या सेवा उपलब्ध
करुन घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबाडे यांनी केले या प्रसंगी ग्रामपंचायत मानाचे सरपंच जमील अहेमद कुरेशी, नायब तहलिसदार उमेश बन्सोड, निरीक्षण अधिकारी रुहीना अली, मंडळअधिकारी प्रफुल्ल काळे, तलाठी सरिता चाटे, ग्रामविकास अधिकारी राठोड व नागरीक उपस्थित होते.