शाम जाधव, शहर प्रतिनिधी नाशिक
7248993599
आडगाव असता आज दि १२/१२/२०२२रोजी कत्तल खाण्यासाठी नेत असता
काल रात्री सिन्नरच्या बाजार समितीतून MH-15 BJ 8751 हा पिकअप बाहेर पडताना कर्तव्यदक्ष गोरक्षक हेमंत राजपूत यांनी पाहिला आणि मानद पशुकल्याण आधिकारी आबा नायकवडी यांचेशी संपर्क केला.
आबा नायकवडी यांनी हेमंत राजपूत यांना गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले. हेमंत राजपूत आणि त्यांचे सहकारी आवि पवार, गणेश घोसके यांनी सदर वाहनाचा ४० किमी पर्यंत मोटर सायकलवरून पाठलाग केला. आबा नायकवडी यांनी नाशिकचे बजरंग दलाचे प्रमुख समाधान कापसे यांच्यामार्फत गोरक्षक सागर वाघ यांचेशी संपर्क केला आणि त्यांना गाडी थांबवण्यास सुचवले. सागर वाघ यांच्या निरोपाप्रमाणे ४०-५० युवक लाखलगाव फाठा या ठिकाणी रस्त्यावर उभे राहिले आणि त्यांनी ओझरच्या कत्तलखान्यात जाणारा पिकअप अडवला. त्यानंतर आबांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिस कारवाईनंतर सदर वाहनातील ३ धष्टपुष्ट बैल नाशिकच्या तपोवन येथील गोवर्धन गोशाळेत सोडण्यात आले. आडगाव पोलिस स्टेशनने ही कामगिरी पूर्ण केली.
आबाचे चातुर्य, हेमंत व त्याच्या सहकाऱ्यांची मेहनत आणि सागरचे धैर्य यांच्या समन्वयामुळे ३ बैलांना जीवदान मिळाले.