तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे 2 जानेवारी पासून 63 वा गुंफा यात्रा महोत्सव

6 जाने ला गोपालकाला 

        

 सुनिल कोसे , चंद्रपूर/चिमूर :    विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गुंफा गोंदडा येथे श्री गुरुदेव गुंफा समिती व श्री गुरुदेव साधनाश्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती गोंदेडा च्या वतीने दि 2जाने ते 6 जाने ला 63 वा गुंफा यात्रा महोत्सवाचे अनेक विविध कार्यक्रमाच्या आयोजनात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे..

                   दर वर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे दि 2 जाने ला ग्रामसफाई सामुदायिक ध्यान रामधून आणि घटस्थापना करून कार्यक्रमांना सुरवात होणार आहेत घटस्थापना सौ उषा वाढई अध्यक्ष गु यात्रा महोत्सव विठ्ठलराव सावरकर गुरुजी अध्यक्ष गु समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे श्रमदान पशुरोगनीदान शिबीर भजन ग्रामगीता पाठांतर स्पर्धा सामुदायिक प्रार्थना भजन कीर्तन संमेलन आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत दि 3 ला ग्रामसफाई सामुदायिक ध्यान रामधून श्रमदान भजन सामुदायिक प्रार्थना विविध गटातील बाल पुरुष महिलांच्या भजनस्पर्धा उदघाटन सोहळा व दि 4 ला ग्रामसफाई सामुदायिक ध्यान रामधून श्रमदान महिला मेळावा व या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सौ अर्पणा भांगडीया आणि उदघाटक म्हणून प्राजक्ता बुरांडे तहसीलदार चिमूर उपस्थित राहणार आहेत यानंतर व्यसनमुक्ती वर कार्यक्रम सामुदायिक प्रार्थना व कीर्तन आणि पुरुष विभाग भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत दि 5 जाने ला ग्रामसफाई रामधून गुरुदेव कार्यकर्ता मेळावा श्रमसंस्कार शिबीर युवक मेळावा आयोजित केला असून या कार्यक्रमाला डाँ एन एस कोकोडे सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश संकपाळ उपविभागीय अधिकारी, मनोज गभने पोलीस निरीक्षक चिमूर मान्यवर म्हणून उपस्थित राहणार यानंतर सामुदायिक प्रार्थना भजन कीर्तन शास्त्रीय संगीत भजन संध्या आदी कार्यक्रम होणार आहे

          दि 6 ला ग्रामसफाई सामुदायिक ध्यान रामधून व पालखी मिरवणूक ध्वजारोहण आणि पालखी सत्कार पालखी श्रमदान यज्ञ रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधे वितरण यानंतर स्वरगुरुकुंजचे कार्यक्रम होणार असून गुंफा यात्रा समिती अध्यक्ष ची निवडणूक आणि लगेच गोपालकाला संकीर्तन हभप लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या हस्ते होणार आहे यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला प्रमूख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी मा मंगलप्रभात लोढा पर्यटन आणि कौशल्य उद्योजकता व महिला बाल विकास मंत्री म रा , चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी म रा ,अशोकजी नेते खासदार चिमूर गडचिरोली, मितेश भांगडीया माजी आमदार विधान परिषद, किर्तीकुमार भांगडीया आमदार चिमूर विधानसभा तथा संचालक गुरुकुंज आश्रम मोझरी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती मध्ये दामोदर पाटील उपसेवाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी प्रकाशपंत वाघ प्रचार प्रमूख गुरुकुंज आश्रम मोझरी जनार्धनपंत बोथे सरचिटणीस सौ उषाताई संभाजी वाढई अध्यक्ष गुंफा यात्रा महोत्सव श्रीमती गिरजाबाई गायकवाड सरपंच गोंदेडा विठ्ठलराव सावरकर अध्यक्ष गु गु स गोदेडा जीतूभाऊ होले यावली सूत्र संचालन प्रा भास्कर वाढई आणि आभारप्रदर्शन एन एस भोयर सर करणार आहेत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहेत

         यात्रेला येताना स्वतःची काळजी स्वतः घ्यावी थंडीचे साहित्य सोबत आणावे कुणीही नशापाणी करून येऊ नये यात्रेत जास्तीत जास्त पालख्यानी सहभाग नोंदवावा असे आवाहन गुंफा समिती व गुंफा यात्रा महोत्सव समितीने केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post