(वृत्तपत्र लेखक - गुरुनाथ तिरपणकर)
सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय,नाट्य-चित्रपट सृष्टी अशा विविध क्षेत्रात नामवंत व्यक्ती कार्यरत असतात,आपणासहीत सर्व व्यक्ती वयोमानानुसार वृध्द होणारच आहोत.त्यामुळे आजारपण,व्याधी येणारच,ते कुणालाही चुकलेल नाही.सर्व साधारण व्यक्ती ही आजची पडतात मरतात. अशावेळी नामवंत व्यक्तींचीही सुटका नाही. अशा हाॅस्पिटल प्रशासन,त्यांचे कुटुंबीय त्यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात.आणि अशावेळी कुठलीही शहानिशा न करता हे व्हाटसप,फेसबुकवरील हे नेटकरी निधन झाल्याची फेक न्यूज शेअर करतात.हे दुर्दैवी आहे. याअगोदरही अशा राजकीय,सेलिब्रटींच्या निधन न होता अशा फेक न्यूज पसरविल्या गेल्या आहेत. अडाणी माणसाला फेसबुक,व्हाटसप हे काही माहित नाही,पण आपण सर्व सुज्ञ आहोत,व्हाटसप,फेसबुकव उत्तम प्रकारे हॅन्डल करतो. आणि अशावेळी न घडलेली दुखःद घटना शेअर करतो तेव्हा आपल्या सदविवेक वृध्दीची कीव करावीशी वाटते. अशा घटना या अगोदरही घडलेल्या आहेत. कुठल्याही घटनेची आपण शहानिशा करत नाही.कुठुनतरी आलेला फाॅरवर्ड मॅसेज स्वप्रसिध्दीसाठी इतरत्र फाॅरवर्ड केला जातो,ही लांन्छदास्पद बाब आहे. असे मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी घरातील टीव्ही सुरु करुन मराठी न्युज चॅनलला पहा,काय ब्रेकींग न्यूज आहे,तेही तसदी घेत नाही.हाॅस्पिटलकडुन कुठलेही प्रेस बुलेटीन नाही,कुटुंबियांकडुनही कुठलीही माहिती दिली गेली नाही,तर फेसबुक व व्हाटसपवर हे नेटकरी आपल घोड पुढे दावटवत असतात,तरी सर्वांना विनंती आहे की जिवंतपणी असा अंत पाहु नका.फेसबुक,व्हाटसपवरील नेटक-यांनो कुठेतरी थांबवा हे!!
(गुरुनाथ तिरपणकर, बदलापूर)
वृत्तपत्र लेखक 93236 62619