लातुर जिल्हा प्रतिनिधी
उत्तम माने
मो.नः 8484878818
लातूर (जि.प्र) : - लातूर येथील जेष्ठ विधी तज्ञ तथा देवणी तहसील कार्यालय येथील सेवानिवृत तहसीलदार चंद्रकात सुरवसे आज पहाटे अल्पश आजाराने दुःखद निधन झाले आहे. दिवंगत चंद्रकांत सुरवसे यांनी आपल्या सेवाकाळात दलितांना गायरान जमिनी मिळाव्यात म्हणून मोलाचे कार्य केले आहे. ते नेहमी दलित चळवळीला मदत करून खंबीरपणे साथ देत होते त्यांनी अनेक पिडीतांना निस्वार्थीपणे न्याय मिळवून दिला आहे. ते कास्ट्राईब कर्मचारी महासंघांचे माजी पदाधिकारी होते. त्यांनी कास्ट्राईबच्या माध्यमातूनही अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे लातूर विधी सल्लागार शाशिकांत सुरवसे यांचे ते वडील होते. अंत्यविधी आज सायंकाळी ठिक 4:00 वाजता खाडगाव स्मशानभूमी येथे होणार आहे. कास्टरईब शिक्षक संघटनेच्या वतीने चंद्रकांत सुरवसे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.