लातूर जिल्हा प्रतिनिधी
उत्तम माने
मो.न: 8484878818
लातूर (जि.प्र) : - निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील अतुल वसंत तुरे यांचा दि.23/09/22 रोजी रात्री 9:30 वाजता खून करण्यात आला होता गुन्हा नं 246/22 नुसार 302 चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरी आरोपी 1) दिलीप गोविंद मुंजाळ 2) गफूर मेहताबा तांबोळी यांना दोन महिन्यानंतर ही अटक होत नाही म्हणून वरील आरोपी हे सुवर्ण व सदन असल्यामुळे पैशाच्या जोरावर व राजकीय दबावपोटी गुन्हा दाबण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून खुन झाल्यापासून ते आजपर्यंत आरोपीस जानून बुजून अटक करण्यात आले नाही वरिल आरोपीपासून पिडीतांच्या कुंटूबाच्या जीवास धोका आहे. म्हणून पिडीत कुंटूबानी उपजिल्हा अधिकारी कार्यालय निलंगा येथे उपोषणास बसले होते. आज रोजी पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, यांनी दहा दिवसात आरोपीस अटक करू असे आश्वासन दिल्यावर आज उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.
आरोपीस दहा दिवसात अटक न केल्यास येणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडून न्याय मागू असे विरलहूजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी यांनी आमच्या गावाकडील बातमीचे प्रतिनिधी उत्तम माने यांच्याशी बोलताना केली आहे.
या उपोषणास सुमित वसंत तुरे , अजय कांबळे, वसंत तुरे यांची संस्थापक अध्यक्षशंकर तडाके, आनंद वैरागे, गोविंद सूर्यवंशी यांनी भेट देऊन पोलीस व पीडीतामध्ये तडजोडीनंतर उपोषण मागे घेतले.