चंद्रपुर : गडचिरोली - पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने ' रमाई बिगेड चंद्रपूर तर्फे भव्य महिला सक्षमीकरण मेळावा दि . 30 नोव्हेंबर 2022 ला दुपारी ११ वाजता महसुल भवन ' पाण्याच्या टाकीजवळ चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार तथा पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहणार असुन सह उद्घाटक जयदिप कवाडे कार्याध्यक्ष पिरिपा कार्यक्रमचे अध्यक्ष हरिषभाई दुर्याधन अध्यक्ष पिरिपा जिल्हा चंद्रपूर तसेच प्रमुख अतिथी म्हणून चरणदास इंगोले,राष्ट्रीय सरचिटणीस पिरिपा सुनंदा आत्राम ,राजु दाणी,डॉ. प्रशिक वाघमारे,धर्माजी पाटिल, सुमेथ मुरमाडकर, डॉ प्रेमानंद खंडारे,लक्ष्मीकांत पाझारे, पवन भगत,जोत्स्ना मेश्राम, वंदना वाघमारे, गिता निरपुडे, रविद्र दहिवले, जीवन वनकर आदीची उपस्थिती लाभणार आहे. तरी हजारोचा संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन रमाई महिला ब्रिगेड च्या वंदना सुर्यवंशी, आरती दुपारे, जितेंद्र करमरकर, यशमीन बागेसर आदीनी केलेले आहे.