काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीची आढावा बैठक संपन्न....

 


 जिल्हा प्रतिनिधी, उत्तम माने,लातूर :- निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या निलंगा तालुक्यातील ६८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती आखण्या संर्दभात व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी पॅनल प्रमुख, आजी, माजी सरपंच, व कार्यकर्त्याची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथील मातोश्री सभागृह येथे संपन्न झाली.


यावेळी आढावा बैठकीत बोलताना अशोकभैय्या म्हणाले की, आपल्या गावाची निवडणूक ही लोकनेते स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकासरुपी आधारावर व धर्मनिरपेक्षवादी विचाराने गावाच्या सर्वांगीण विकासासंबंधी लढवावी. विरोधक तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपापल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करून स्वता:ची पोळी भाजण्याच काम करतील. कदाचित आम्ही एकच आहोत अशा पुड्या सोडून संभ्रम निर्माण करून काहींना पुड्या सोडण्यासाठी सांगतील.अशा पुड्याबाहदरापासून येणारा काळात भविष्यात सावध रहा. असे जर असले तर मी तुम्हाला आढावा बैठकीसाठी बोलवलं असतो का. दादासाहेबांचा पक्षनिष्ठेचा वारसा घेऊन मरेपर्यंत कायम राहणार आहे. 

  यापुढे कार्यकर्त्यांना दमबाजी होत असेल अर्ध्यारात्री मला संपर्क करा. मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे ते आवर्जून म्हणाले. याच कार्यक्रमात निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ६८ गावासाठी पक्षनिरीक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मंचावर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये काँग्रेस प्रदेश सचिव अभयजी साळुंके, निलंगा काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी पं.स. सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, चक्रधर शेळके, निलंगा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, शिरुर अनंतपाळ नगरसेवक सुधीर लखनगावे, लालाभाई पटेल, सुधाकर पाटील, समियोद्दीन देशमुख, देवदत्त पाटील, माधवराव पौळ, भीमराव पाटील, पंडितराव भदरगे, सोनाजी कदम, रमेश मोगरंगे, ज्ञानेश्वर पिंड, विकास पाटील, भगवान पाटील, राम धुमाळ, स्वरूप येळकर, अँड. तिरुपती शिंदे, निलंगा कॉंग्रेस महिला तालुका अध्यक्ष भारतबाई माने इ. सह पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोकराव पाटील निलंगेकर मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दयानंद चोपणे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post