पीएच.डी.प्रक्रियेतील संशोधन व मान्यता समितीची(आर.आर.सी.) सभा त्वरित घ्या



🔹गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स संघटनेची मागणी🔹


सहायक संपादक ✍️दिनेश झाडे


चंद्रपूर/राजुरा :- -गोंडवाना विद्यापीठातील विविध शाखेत अनेक विषया तील संशोधन प्रक्रिया सुलभ व नियमितपणे होणे आवश्यक आहे.गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध संसाधने,ऐतिहासिक वारसा व संस्कृती, आदिवासी जीवन, वनसंपदा लक्षात घेता विविध विषयात संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे संशोधन आराखडा, शोध प्रबंध,मार्गदर्शक अर्ज आणि पदव्युत्तर शिक्षक अर्ज इत्यादी बाबत मान्यता देण्यासाठी संशोधन व मान्यता समिती कार्यान्वित असून सदर समीतीची सभा वर्षातून दोन वेळा घेणे बंधनकारक असते मात्र सन 2022-23 मध्ये पहिल्या सत्रात अर्थात आक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये नियोजित असलेली सभा न घेतल्यामुळे संशोधन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर संशोधन व मान्यता समितीची सभा त्वरित घेण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ने विद्यापीठाचे मूल्यमापन परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांच्याकडे केली असून त्यांनी सदर सभा त्वरित घेण्याचे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

    गोंडवाना विद्यापीठाने जा.क्र./गोविग/पीएचडी/570/2022 दिनांक 6 जून 2022 च्या परिपत्रकाच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा संशोधन व मान्यता समितीच्या सभा घेण्यासंबंधी निर्देशित केलेले होते मात्र त्याचे पालन विद्यापीठाकडून होत असताना दिसत नाही विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार संशोधन व मान्यता समितीच्या सभा उपरोक्त सत्रामध्ये ऑक्टोबर -नोव्हेंबर व एप्रिल-मे या महिन्यामध्ये अंदाजीत करण्यात आलेल्या होत्या मात्र पहिल्या सत्रातील नियोजित केलेला कालावधी हा निघून गेलेला आहे. 

     सदर समितीची सभा न घेतल्यामुळे संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना त्यांच्या संशोधन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात त्वरित निर्णय घेऊन संशोधन व मान्यता समितीची सभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांचे कडे केली आहे.

         या प्रसंगी शिष्टमंडळात गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ.संजय गोरे, संघटनेचे सचिव व सिनेट सदस्य डॉ.विवेक गोरलावार व संघटनेचे सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने व पदाधिकारी दालनात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post