इंझाळा ग्रामपंचायतच्या पुढाकारात बांधला वनराई बंधारा

 





घाटंजी : तालुक्यातील इंझाळा ग्रामपंचायतिच्या पुढाकारातून गावालागत श्रमदानातून वनराई बंधारा बांधला गेला. त्यामुळे परिसरातील जमिनीत पाण्याचा निचरा होऊन शेती, जनावरे यांना निश्चित फायदा होईल असा आशावाद निर्माण झाला आहे.

         महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केल्याने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तथा पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या घोषवाक्याला अनुसरून व गट विकास अधिकारी सिकंदर इनामदार यांनी केलेल्या आवाहनातून मिशन जलामृत अंतर्गत विविध कामे यातून वनराई बंधारा श्रमदानातून बंधारा बांधला. बंधारा बांधतांना वैजयंती सचिन ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी मुन,ग्रामपंचायत अधिकारी अमोल जंगमवार, मनोज आडे,निकेश कोटनाके, सोनू मडावी यांचेसह गावातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post