धोत्रा-सालोरा मार्गावर प्रवासी बस पलटी; परिसरात खळबळ!





धोत्रा-सालोरा मार्गावर प्रवासी बस पलटी; परिसरात खळबळ!


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धोत्रा ते सालोरा मार्गावर आज दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास प्रवासी बस पलटी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या अपघातात बसमधील किती प्रवासी प्रवास करीत होते, तसेच किती जण जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. अपघाताचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये घटनास्थळाबाबत चर्चा सुरू झाली असून, अपघातासंदर्भातील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


(सविस्तर माहिती प्राप्त होताच पुढील वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.)


— गावाकडची बातमी

जिथे गाव..! तिथे आम्ही..!

Post a Comment

Previous Post Next Post