किनवट : आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. पुंडलिक गोमाजी आमले यांच्या पुढाकारातून **जय जोहार आदिवासी जनजागृती आरोग्य संस्था, किनवट** या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, ग्रंथालय, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर काम करण्यात येणार आहे.
**समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचविणे, हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. पुंडलिक आमले यांनी सांगितले.
यापूर्वी सुरू असलेल्या सामाजिक कार्याला आता संस्थेच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असून, समाजातील डॉक्टर, अधिकारी, शिक्षक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. आमले यांनी केले आहे.




