विशेष प्रतिनिधी : सुनील धुर्वे | यवतमाळ
यवतमाळ : जिल्ह्यातील विविध सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर) वापरण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, यंदा एकूण ११ प्रमुख सण व उत्सवांसाठी १३ दिवस ध्वनी मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार आहे.
पर्यावरण विभागाच्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाला वर्षातील १५ दिवस ध्वनी मर्यादा शिथिल करण्याचा अधिकार आहे. हा आदेश उघड्या मैदानात आयोजित कार्यक्रमांना लागू राहणार आहे. बंदिस्त सभागृह किंवा मेजवानी कक्षांमध्ये मात्र संबंधित ध्वनी नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.
आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

