120 बसेस भाविकांना गडावर नेणार
सर्व विभागांचे दोन हजारावर अधिकारी कर्मचारी ठेवणार भाविकांच्या आरोग्य सोयी सुविधा सुरक्षा वाहतूकीकडे लक्ष
श्री क्षेत्र माहूर : माहूर गडावरील साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असलेल्या माहूर गडावर दि 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2026 या काळात संपन्न होणाऱ्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि 6 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 11वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तर सह धर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिध्द अध्यक्षा हिराबाई शेळके पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन जि.प. चे मु का अ महेश पाटील मंदिर संस्थांनच्या अध्यक्षा सह धर्मदाय आयुक्त श्रीमती हिराबाई शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपाध्यक्ष किरणकुमार भोंडवे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव बी.सरवणन तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप जगताप विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांची उपस्थिती होती.
यात्रा काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसुर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले यात्राकाळात भावाकांसाठी सुलभ दर्शन रांग पिण्याचे पाणीलाईट आरोग्य व्यवस्था स्वच्छता परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद व साबुदाणा खिचडी फळांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले नगरपंचायत प्रशासनातर्फे दत्त चौक टिपॉईंट येथे नियंत्रण कक्ष स्वच्छता पिण्याचे पाणी पथदिवे शौचालय इत्यादी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी सांगितले पाचशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी होमगार्ड यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा सुविधा देण्यासाठी सज्ज राहणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली वन विभागातर्फे वन्य प्राण्यांपासून भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिक ठिकाणी सुरक्षा पथक नियुक्त करून वन कर्मचाऱ्यांची जंगल शिवारात गस्त वाढविण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांनी सांगितले सा.बांधकाम विभागातर्फे रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे उप अभियंता डी.के. भिसे यांनी सांगितले, नवरात्र उत्सव काळात ग्रामीण रुग्णालयात 40 बेड असून यात्रा व्यवस्थापनात 20 बेड आरक्षित करण्यात येणार आहे पुरेसा औषधी साठा रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.ओंकार साबळे यांनी सांगितले दत्तशिखर अनुसया माता रेणुका मदीराच्या पायथ्याशी आरोग्य पथके रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ता.आरोग्य अधिकारी राजेश माचेवार यांनी दिली पंचायत समितीकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी दिली गडावर ये जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 120 बसेस उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आगर प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी सांगितले विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता वसमतकर यांनी अखंडित वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची ग्वाही दिली नवरात्रापुर्वी महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता एस.एस.देशपांडे यांनी सांगितले. दत्तशिखर संस्थांनतर्फे भाविकांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छता लाईट महाप्रसाद गडावरील मार्गावर असलेल्या संस्थांनच्या जागेत मोफत पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक जी.एन,नाईक यांनी सांगितले.
यावेळी पुरातत्व विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुखांनी या बैठकीला दांडी मारल्याने त्यांना या बैठकीचे गांभीर्य वाटले नाही का ? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार विजय आमले यांनी उपस्थीत केला असता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या गंभीर बाबीची दखल घेणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार विजय आमले, अपिल बेलखोडे,सरफराज दोसाणी, राज ठाकुर, नितेश बनसोडे,राजकीरण देशमुख, जयकुमार अडकीने, बालाजी कोंडे, संजय घोगरे, सिध्दार्थ तामगाडगे,महीला पत्रकार पद्मा गीते,सुरेखा तळणकर, सुरज राठोड,मोहन राठोड, गोपाल चव्हाण,यांचेसह प्रतिष्ठित नागरिक,देवस्थानाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहूर गडावर श्री रेणुका माता मंदिरात साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सवात सर्व विभागांचे मिळून दोन हजारावर अधिकारी कर्मचारी यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य सोई सुविधा सुरक्षा वाहतूक सह इतर कुठलाही त्रास भाविकांना होऊ नये म्हणून दक्षता घेणार असल्याने भाविकांनी बिनधास्तपणे आनंदात दर्शन घ्यावे असे आवाहन श्री रेणुका माता मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


