गुरु गौरव व संत लोकजागृती उत्कृष्ट पत्रकारिता व कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

 



 किनवट :  मा. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती पित्यर्थ "उत्कृष्ट गुरु गौरव तसेच "संत लोकजागृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2026-27 या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन किनवट जनतेकडून करण्यात आले होते. शनिवार रोजी 

दि. 5 /9/ 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह गोकुंदा किनवट येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आनंद भालेराव होते तर महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त श्री.रामा बंडू उईके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती संध्या माधवराव माळकर यांनी केले. या पुरस्कार सोहळयाचे आयोजन प्रा.संतोष गोपीचंद पवार, अँड. साईप्रकाश नार्लावार आणि श्री. बालाजी तोटेवाड यांनी केले. त्याकरिता त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने मान्यवरांचा गौरव :

 शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक यांना उत्कृष्ट शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले. सन्मान प्राप्त शिक्षकांमध्ये श्री. दत्तात्रय शिवाजी मुंडे (विशेष शिक्षक शनिवार ) श्री. सुनील रामराव चव्हाण श्री. जगदीश व्यंकटराव कोमरवार( जि. परिषद प्रा. शाळा,घोटी ) श्री. श्री नागनाथ महादू जंगेपल्लेवाड ( जि.प. जवळा पंचाळा, ता.कळमनुरी ) श्री नरेंद्र मनोहर कळंभे( जि. प. प्रा. शाळा सारखणी) श्री धनंजय किशनराव नाईकवाड, ( जि. प. प्रा. शाळा), श्री मारुती गंगाराम गंगासागरे (जि.प .प्रा. शाळा तल्लारी )

लक्ष्मण सूर्यभान कातले (गोंडवाडी उत्कृष्ट गायक) श्री. संदीप निवृत्ती गायकवाड, प्रा. डॉ. दिलीप संभाजी पालीमकर (वसंतराव नाईक महाविद्यालय नांदेड), प्रा.डॉ.राजेश श्रीराम धनजकर , श्री परशुराम बाबाराव देशमुख ( जि.प. प्रा. शा. पिंपरी ), प्रा.कु. गंगा शिवाजी यरोळकर ( श्रीराम कृष्ण क्रीडा विद्यालय अमरावती ) गायकवाड संदीप निवृत्ती आणि शेख सरफराज,नेहरू वाचनालय नगरपरिषद, किनवट 

 संत लोकजागृती उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान 2026-

 समाजामध्ये संत विचार,लोक जागृती आणि सामाजिक प्रश्नांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.राष्ट्रसंत विचाराची राष्ट्रहीत आपल्या लेखणीतून निर्भिड लिखान करणारे दैनिक देशोन्नतीचे श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील पत्रकार श्री विनोद डवले, तसेचश्री लक्ष्मीकांत नामदेवराव मुंडे "आत्ताच एक्सप्रेस" आवृत्ती संपादक यांना संत लोकजागृती पत्रकारिता सन्मान 202627 प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात किनवट शहरातील विविध क्षेत्रात नामवंत नागरिक,शिक्षक,पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते प्रचंड टाळ्यांच्या गडगडात टाक हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.

सदरील कार्यमांस

डाॅ योगेश सोमवंशी,व आकाश वाघमारे यांनी भेट देऊन अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post