माहूर तालुका एमआयएम समाजकार्यात अग्रेसर
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुका एम आय एम ची धुरा युवा नेते तथा ए आय एम आय एम चे माहूर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद शेख अजीज तसेच युवा नेते नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार म्हणून समाजसेवेत अग्रेसर असलेले इरशाद हाशम मकरानी यांनी संभाळल्यापासून पक्ष समाजकार्यात अग्रेसर असल्याने रुई तालुका माहूर येथील शमशोद्दीन शरफोद्दीन काझी यांनी अनेक वर्षापासून होमगार्ड ची सेवा बजावत जिद्दीने अभ्यास करून शिक्षक या पदापर्यंत मजल मारल्याने कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांच्या हृदय सत्कार केला
माहूर तालुका ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने सर्व सामान्य नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन त्यांचे निराकरण करण्या साठी मोलाचे परिश्रम घेत आहेत तळागाळातील नागरिकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचाव्यात त्यांना लाभ मिळावा यासाठी विविध प्रकारे नागरिकांना मदत करत आहेत शहरासह माहूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत सण उत्सवात सर्व धर्मीय समभाव जोपासण्यात ए आय एम आय एम पक्ष अग्रेसर आहे त्यामुळे माहूर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात एमआयएम च्या शाखा मोठ्या प्रमाणात उघडत आहेत.
जिद्द मेहनत तसेच हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेणारे व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांना मार्गदर्शन वेळ प्रसंगी मदतही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्याने अनेक वर्षापासून वडील होमगार्ड सेवेत तर स्वतःही अनेक वर्षापासून होमगार्ड सेवा बजावत जिद्द चिकाटी मेहनतीने अभ्यास क्रम पूर्ण करून वर्धा येथे शिक्षक म्हणून निवड झाल्याने शेख सज्जाद इर्शाद मकरानी यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शमशोद्दीन काझी काजी यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका अध्यक्ष शेख सज्जाद शेख अजीज युवा नेते इरशाद भाई मकरानी शहेजाद नवाब फैजुल्ला पठान फीरोज आली मुकतार भाई कयुम लाला वसीम भाई आयुब बाबा यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

