आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक
श्रीक्षेत्र माहूर: माहूर तालुका ए ,आय ,एम ,आय, एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथे पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा केली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकीच्या सामाजिक उपक्रमांच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली
ए, आय ,एम ,आय, एम ,चे माहूर तालुका अध्यक्ष अध्यक्ष सज्जाद भाई युवा नेते इरशाद भाई मकरानी यांनी महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला आणि शमीम अब्दुल्ला यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आगामी निवडणुका संघटनात्मक बांधणी सामाजिक उपक्रम गोरगरीब नागरिक एकल महिला दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माहूरच्या विकासासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार करण्यात येऊन गाव तेथे शाखा घराघरात एम आय एम असा नारा यावेळी देण्यात आला त्यावेळी तालुका अध्यक्ष सजाद भाई युवा नेते इरशाद मकरानी फैजुल्ला खान इरफान बागवान
समीर शहेजाद नवाब आयुब बाबा अरशद खान शाहीद लाला बबलु टेलर आजीस भाई यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते


