ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर महागावात पोलिसांचे पथसंचलन

 



 प्रतिनिधी  श्रीकांत राऊत  


महागाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर महागाव शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी महागाव पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी (२५ ऑगस्ट) शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.

या पथसंचलनाची सुरुवात महागाव पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर गणपती चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, बिरसा मुंडा चौक, सोनार लाईन, नाईक चौक, बस स्थानक, जुने बस स्थानक या प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी पथसंचलन केले. त्यानंतर पथसंचलनाचा समारोप पुन्हा महागाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आला. महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसेनजित जाधव, सुनील अंबुरे यांच्यासह पोलीस जमादार, अंमलदार, पोलीस शिपाई तसेच होमगार्ड मोठ्या संख्येने पथसंचलनात सहभागी झाले होते.

ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत पार पडावा आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी महागाव पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासोबतच शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला.

Post a Comment

Previous Post Next Post