गळक्या छताखाली सुरू युनियन बँकेचा कारभार; महत्त्वाची कागदपत्रे धोक्यात

चिखलदरा, Gavakadachibatmi


उघड्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किटची भीती; महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही..

अमरावती मेळघाट, union Bank of India


विशेष प्रतिनिधी | चिखलदरा राजू खडके

 अमरावती : चिखलदरा येथील नगर परिषद इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेची दुरवस्था समोर आली आहे. इमारतीत ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे व फाईली खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगर परिषद तसेच बँक व्यवस्थापनाकडून आवश्यक दुरुस्ती होत नसल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे.

चिखलदरा येथील मुख्य बाजार चौकात युनियन बँकेची शाखा आहे या बँकेत हजारो लोकांची बँक खाते आहेत त्यामुळे दररोज शेकडो ग्राहकांची वर्दळ असते अशातच बँकेची दुरवस्था समोर येत असून बँकेच्या आतील भागातील विद्युत वायरिंग पूर्णपणे जीर्ण होऊन अनेक ठिकाणी उघडी व अस्ताव्यस्त पडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची भीती कर्मचारी व ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ग्राहकांना तसेच बँक कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नसल्याचे सांगितले जात आहे.

बँकेतील फाईलींमध्ये उंदरांचा वावर असल्याचेही दिसून येत तसेच आतील भागात भिंतींना भेगा पडल्या असून आतून कित्येक वेळा साप दिसला असे कर्मचारी सांगत आहेत त्यामुळे महत्त्वाच्या नोंदी व कागदपत्रांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी बँक व्यवस्थापन आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे तातडीने इमारतीची दुरुस्ती करून सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post