आष्टीत २९ ऑगस्टला ‘संतांचा विचार वारसा आणि आपण’ विषयावर जाहीर व्याख्यान

 


वर्धा,प्रतिनिधी मंगलाताई भोगे 

आष्टी (शहीद) : श्रावण महिन्यातील ज्ञानसप्ताहाचे औचित्य साधून माणिकधारा बहुउद्देशीय संस्था, आष्टी (शहीद) यांच्या वतीने ‘संतांचा विचार वारसा आणि आपण’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे व्याख्यान शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकमान्य विद्यालय, एम.सी.व्ही.सी. हॉल, आष्टी (शहीद) येथे होणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते, सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार मा. विशाल विमल (पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आष्टी तालुका सेवा अधिकारी मा. तारेश बोडखे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

संतांची पुरोगामी व प्रगल्भ विचारधारा जपून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. संतविचारांचे आजच्या जीवनातील महत्त्व समजून घेण्यासाठी नागरिकांनी स्नेही, मित्रपरिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सायंकाळी ठीक ४ वाजता सुरू होणार आहे.

विनीत : माणिकधारा बहुउद्देशीय संस्था, आष्टी (शहीद)

Post a Comment

Previous Post Next Post