सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केले स्वागत
घाटंजी : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली. चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढली. पहिल्या दिवशी पारवा जिल्हा परिषद कन्या शाळेत नवागत विध्यार्थिनींना पुस्तके, गणवेष व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. त्यामुळे विध्यार्थिनीतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
नव्यानेच इयत्ता पाहिलीत दाखल झालेल्या विध्यार्थिनींची गावातून विशेष वाहनातून मोठ्या ऐटीत फेरी काढून ग्रामपंचायत कार्यालयात नेण्यात आले त्याठिकाणी सरपंचा सौ. संगीताताई मडावी, उपसरपंच संजय आरेवार, सदस्य बालाजी पोटपिल्लेवार, अर्जुन आत्राम, राजू दवणे यासह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नवागत विध्यार्थिनींचे कौतुक करीत स्वागत करून खाऊंचे वाटप केले. सोबतच शिक्षणाप्रती प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवे शालेय साहित्य, नवा गणवेष, नवे संगवडी, नवे शिक्षक अश्या प्रसन्न उत्साही वातावरणात शाळेचा पहिला दिवस होता. नवीन वर्गात विध्यार्थिनींना नेऊन सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरु होती. वर्गात प्रवेश करतांना नवागत विध्यार्थिनींच्या चेहऱ्यावर कुतूहल व उत्साह जाणवत होता. सकाळी विध्यार्थिनींचे औक्षवंत करून त्यांचे स्वागत करून फुलांचा वर्षाव करीत शाळेत आणण्यात आले.साडेदहा वाजता प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
दुपारदरम्यान नवागत विध्यार्थिनीं वरच्या वर्गातील विध्यार्थिनीं एकत्रित सोबत बसून भोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर खेळण्याच्या वेळात क्रीडा साहित्याचा वापर करीत खेळाचा सुद्धा कसर सोडली नाही. अश्या या शाळेच्या पहिला दिवसाच्या वातावरणाने शाळा परिसर दणानून गेले होते. यावेळी येणार जाणार पालक विध्यार्थिनींकडे बघून कौतुक करीत होते. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी सरस्वती पूजन करून सर्वांचे स्वागत केले.आणि नविन शैक्षणिक वर्षाचा शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्व व शालेय नियमावली यावर विस्तृत माहिती देत विध्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिला दिवसाचे शाळा प्रवेशत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स. शिक्षक प्रशांत भेदूरकर सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकरे तथा पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

