भाजपा महिला मोर्चा भडगांव मंडल अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड...!

 



गणेश पाटील, प्रतिनिधी 

भडगांव  : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगांव मंडळ कार्यकारणी माननीय मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशान्वये नामदार गिरीशजी महाजन, महामंत्री राजेशजी पांडे, प्रभारी रविंद्रजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेशजी चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांच्या मान्यतेने भडगांव मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी भडगांव मंडल भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी योजनाताई पाटील यांची निवड जाहीर केली आहे. योजनाताई पाटील यांचे भडगांव शहर तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक, क्षौक्षणिक, धार्मिक, शासकीय योजना, सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे, सदर योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. योजनाताई पाटील यांनी भडगांव नगरपरिषद, शेतकरी सहकारी संघ, महिला दक्षता समिती, संजय गांधी निराधार योजना, पिपल्स बँक, तनिष्का यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान, दामिनी महिला संघ आदी प्रमुख पदावर यशस्वीरित्या सेवा कार्य आहे. त्यांच्या निवडीचे पक्ष पदाधिकारींसह माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, निर्मल सिडस्  संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post